BJP गांधीवादी कधीपासून झाली? Sharad Pawar यांचा सवाल | Mahatma Gandhi
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे वादंग उठलं आहे. भाजपनेही यावरून अमोल कोल्हेंवर टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे वादंग उठलं आहे. भाजपनेही यावरून अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. भाजपच्या या टीकेची राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले?, असा बोचरा सवाल शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. भाजपनेही अमोल कोल्हेंवर टीका केली आहे, याकडे पवारांचं मीडियाने लक्ष वेधलं. त्यावर, भाजप गांधीवादी कधीपासून झाले? भाजप आणि संघाच्या इतिहासावर मी भाष्य करू शकत नाही. एकेकाळी गांधीविरोधात वेगळी भूमिका घेणाऱ्या शक्ती आता नक्की कुठे आहेत हे पाहिलं पाहिजे., असं पवार म्हणाले.