Video | कुणबी आरक्षणाचा आनंदच आहे, पण सकल समाजाला आरक्षण केव्हा ? अशोक चव्हाण यांचा सवाल
मराठा समाजाला आज सरकारकडे काढलेल्या नोटीफिकेशनमुले लाभ मिळणार आहे. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत. त्यांच्या नातलगांना आरक्षण मिळण्याचा मार्ग 16 फेब्रुवारीनंतर मोकळा होणार असल्याबद्दल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतू सकसकट मराठा समाजाला आरक्षण केव्हा मिळणार असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.
नांदेड | 27 जानेवारी 2024 : मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी गेले अनेक महिने संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्या नातेवाईकांना प्रतिज्ञापत्र सादर केल्यास कुणबी जातीचे आरक्षण लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुणबी नोंदी असलेल्यांच्या नातेवाईकांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही आनंदाची बाब नक्कीच आहे. परंतू सरसकट आरक्षणाचे काय ? ज्यांच्याकडे कोणत्याही नोंदी नाहीत. त्यांच्या आरक्षणाचे काय ? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे. हा प्रश्न अंशत: सुटला आहे. ज्यांच्याकडे काही नोंदी नाहीत अशा सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.