किरीट सोमय्या यांच्या पुणे दौर्‍याला काँग्रेसकडून विरोध; कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

किरीट सोमय्या यांच्या पुणे दौर्‍याला काँग्रेसकडून विरोध; कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

| Updated on: Jul 26, 2023 | 2:15 PM

राज्य सरकारचे सुरू असलेल पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओवरून जोरदार रणकंदन माजलं होतं. अधिवेशनात विरोधकांनी आक्षेपार्ह व्हिडीओची चौकशी व्हावी अशी मागणी लावून धरली होती.

पुणे | 26 जुलै 2023 : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं होतं. राज्य सरकारचे सुरू असलेल पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओवरून जोरदार रणकंदन माजलं होतं. अधिवेशनात विरोधकांनी आक्षेपार्ह व्हिडीओची चौकशी व्हावी अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर आता पुण्यात देखील काँग्रेसकडून सोमय्या यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी किरीट सोमय्या हे पुणे दौर्‍यावर आले असताना त्यांना काँग्रेसकडून त्यांचा विरोध करण्यासह त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. येथील गजानन महाराज मंदिर चौकात सोमय्या यांना ‘सोमय्या गो बॅक’ चे फलकासह काळे झेंडे दाखविण्यात आले. किरीट सोमय्या यांच्या जाण्याच्या मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडू नये. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र काँग्रेसकडून त्यांचा विरोध करण्यासह त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले

Published on: Jul 26, 2023 02:15 PM