अरे देवा! चंद्रकांत पाटील म्हणताय महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे!

अरे देवा! चंद्रकांत पाटील म्हणताय महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे!

| Updated on: Feb 09, 2024 | 5:40 PM

'अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत. त्यांना खूप आयुष्य लाभू दे. त्यांची जी दूरदृष्टी आहे ती खूप विकसित होवू दे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 14 पक्षांची जी महायुती आहे तिला लोकसभेमध्ये भरघोस यश मिळू दे', चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

जळगाव, ९ फेब्रुवारी २०२४ : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र बिहार झाला आहे का? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, विरोधकांनी टीका करणं हे त्यांचं काम आहे. पण अशा घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत, प्रत्येक घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जाते आणि त्यात जे दोष आढळतील, त्यांना शासन मिळेल. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या मॉरिस एकनाथ शिंदे भेटीच्या टीकेवरही प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदे हे एवढे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत की दिवसभरात त्यांना साधारण 5 हजार लोक भेटतात. अनेकजण त्यांची भेट घेतात फोटोही काढतात, यावरून मुख्यमंत्री यांचे त्यांच्याशी संबंध आहेत, असे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. त्यामुळे राऊत काय बोलत आहे, याकडे लोक लक्ष देईनासे झाले आहेत.

तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांनी खूप शुभेच्छा दिल्यात. अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत. त्यांना खूप आयुष्य लाभू दे. त्यांची जी दूरदृष्टी आहे ती खूप विकसित होवू दे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 14 पक्षांची जी महायुती आहे तिला लोकसभेमध्ये भरघोस यश मिळू दे. विधानसभेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार येऊ दे अशा शुभेच्छा मी त्यांना वाढदिवसाच्या देतो. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याकडून चुकून महाविकास आघाडी असा उल्लेख करण्यात आला.

Published on: Feb 09, 2024 05:40 PM