मैदान वाचवण्यासाठी पोहचले अन् क्रिकेट खेळत आदित्य ठाकरे यांनी केली तुफान फटकेबाजी, बघा व्हिडीओ
VIDEO | आदित्य ठाकरे मैदान वाचवण्यासाठी पोहचले असताना मैदानात केली तुफान फटकेबाजी, कुठं लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद?
मुंबई : राजकीय नेते म्हटलं की समोर येते ते म्हणजे त्यांचे राजकीय दौरे, भाषणं, सभा, आरोप-प्रत्यारोप. मात्र राजकीय वर्तुळातील नेते यापलीकडे देखील काहीतरी आवड, कलागुण जोपासताना दिसतात. बऱ्याचदा राजकीय नेत्यांची राजकीय मंचावर तुफान फटकेबाजी पाहायला मिळते. मात्र आता ठाकरे गटाचे आमदार नेते आदित्य ठाकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरत थेट फटकेबाजी देखील केल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील खार पश्चिम येथील रावसाहेब पटवर्धन उद्यानाच्या जागेवर महानगरपालिकाने वाहनतळ घालण्याचा घाट घातला आहे. यामुळे स्थानिक नागरिक याविरोधात असून काल या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी नागिरकांची भेट घेत पहाणी केली आणि मुंबईकरांचे उद्यान वाचवण्यात शिवसेना तुमच्या सोबत असेल, असे आश्वासन देखील या नागरिकांना दिले आहे. याचदरम्यान मैदानात क्रिकेट खेळत असणाऱ्या खेळाडूंनी आदित्य ठाकरे यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला. या खेळाडूंच्या आग्रहाखातर आदित्य ठाकरे क्रिकेट खेळले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी केली. उपस्थितांनी आदित्य ठाकरे यांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुकही केले.