पनवेलमधील 'त्या' दर्ग्यावर कारवाई कधी? बॅनरबाजी करत मनसेचा सवाल

पनवेलमधील ‘त्या’ दर्ग्यावर कारवाई कधी? बॅनरबाजी करत मनसेचा सवाल

| Updated on: Mar 24, 2023 | 12:29 PM

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजीपार्कवर झालेल्या जाहीर सभेचा फिव्हर, आता पनवेलमधील पारगावच्या दर्ग्यावर होणार कारवाई?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजीपार्कवर गुढीपाडव्याला जाहीर सभा झाली. यासभेत राज ठाकरे यांनी व्हिडीओ दाखवत माहीममधील एका अनधिकृत मजारीबद्दल उल्लेख केला आणि राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. या सभेत दिलेल्या अल्टिमेटमनंतर त्वरीत कारवाईही करण्यात आली. राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याचा परिणाम आता चांगलाच दिसत आहे. राज ठाकरे यांच्या या सभेनंतर मनसे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून माहीम दर्ग्यानंतर सांगलीत आणि पुण्यातदेखील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली. त्यापैकी सांगलीत कारवाई देखील झाली. मात्र आता पनवेलमधील पारगावच्या दर्ग्यावर कारवाई कधी, असा सवाल मनसेकडून बॅनरबाजी करत विचारण्यात येत आहे. मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी ही बॅनरबाजी करत पनवेलच्या पारगावमधील दर्ग्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Published on: Mar 24, 2023 12:29 PM