दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी कधी लागणार? नाशिकमधील पावसाची स्थिती काय?
नाशिकमध्ये झालेल्या पावसाचा आणि धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा इंडिकेटर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो नाशिकच्या गोदा घाट परिसरातला दुतोंड्या मारुती गेल्या वर्षी चार वेळेस महापुरात न्हाहून निघाला होता, त्या दुतोंड्या मारुतीच्या पायाला देखील यंदा पाण्याने स्पर्श केलेला नाही.
नाशिक, 8 ऑगस्ट 2023 | जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरात मुसळधार पाऊस पडला. मात्र नाशिकमध्ये काही भागात पावसाच्या हंगामाचा तिसरा महिना आला तरी पाऊस पडला नाही आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुके सोडले तरी जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे अन्य तालुक्यांमधील शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. नाशिकमध्ये झालेल्या पावसाचा आणि धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा इंडिकेटर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो नाशिकच्या गोदा घाट परिसरातला दुतोंड्या मारुती गेल्या वर्षी चार वेळेस महापुरात न्हाहून निघाला होता, त्या दुतोंड्या मारुतीच्या पायाला देखील यंदा पाण्याने स्पर्श केलेला नाही.यावरून नाशिकमध्ये पाऊस कशी ओढ देतो, हे स्पष्ट होत आहे
Published on: Aug 08, 2023 02:47 PM