शिवसेना आणि वंचितच्या युतीची घोषणा कधी? प्रकाश आंबेडकर यांनी दिले 'हे' संकेत

शिवसेना आणि वंचितच्या युतीची घोषणा कधी? प्रकाश आंबेडकर यांनी दिले ‘हे’ संकेत

| Updated on: Jan 22, 2023 | 12:41 PM

नागपूर : शिवसेना आणि आमच्या युतीची घोषणा अदयाप झालेली नाही. पण, उद्धव ठाकरे ( uddhav thackrey ) यांची शिवसेना ( shivsena ) आणि आमची युती होणार आहे. काँग्रेस ( congress ) आणि राष्ट्रवादी ( ncp ) यांचा आम्ही विरोध केलेला नाही. त्यांना सोबत घेऊन या असे आम्ही सांगितले आहे. त्यांचेही आम्ही स्वागत करू. बोलणी करणारी […]

नागपूर : शिवसेना आणि आमच्या युतीची घोषणा अदयाप झालेली नाही. पण, उद्धव ठाकरे ( uddhav thackrey ) यांची शिवसेना ( shivsena ) आणि आमची युती होणार आहे. काँग्रेस ( congress ) आणि राष्ट्रवादी ( ncp ) यांचा आम्ही विरोध केलेला नाही. त्यांना सोबत घेऊन या असे आम्ही सांगितले आहे. त्यांचेही आम्ही स्वागत करू. बोलणी करणारी दोन्ही बाजूच्या टीम्स बसल्या आहेत. त्याचे फायनल झाले की घोषणा होईल यात दुमत नाही. ज्या दिवशी त्यांचा निकाल, निर्णय होईल की आपण घोषणा करू. त्यादिवशी आमच्या युतीची घोषणा होईल, असे स्पष्ट प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( prakash ambedkar ) यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.