Sharad Pawar | 5 वेळा छापे टाकून काय मिळालं? देशमुखांवर आरोप करणारे अधिकारी कुठे आहेत? : शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील भाजप नेत्यांपासून ते केंद्रसरकारवर जोरदार हल्ला चढवला. पवारांनी यावेळी 1 तास 2 मिनिटे आणि 43 सेकंद संवाद साधला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील भाजप नेत्यांपासून ते केंद्रसरकारवर जोरदार हल्ला चढवला. पवारांनी यावेळी 1 तास 2 मिनिटे आणि 43 सेकंद संवाद साधला. पवार कुटुंबीयांच्या घरावर पडलेल्या धाडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी शरद पवार यांनी अनिल देशमुखांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंतच्या मुद्द्यावर आणि मावळपासून ते उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील हिंसेवर भाष्य करत भाजपला धारेवर धरले.
देशमुखांवर आरोप करणारे अधिकारी कुठे आहेत?
केंद्र सरकार काही यंत्रणांचा गैरवापर करत आहे. सीबीाय इन्कम टॅक्स, ईडी असेल एनसीबी या सर्व एजन्सीचा वापर राजकीय दृष्टीने केला जात आहे. त्यात काही उदाहरण द्यायचंच तर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री. अनिल देशमुखांवर त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनी आरोप केले होते. मला येऊन भेटले होते. त्यांनी आरोप केले. त्यातून जे वातावरण झालं त्यामुळे देशमुखांना राजीनामा दिला. ज्यांनी आरोप केला ते कुठे आहे ते माहीत नाही. जबाबदार अधिकारी जबाबदार माणसावर बेछुटपणे आरोप करतो हे पूर्वी कधी घडलं नव्हतं. देशमुखांनी बाजूला व्हायची भूमिका घेतली. आता आरोप करणाऱ्यावर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. देशमुख बाजूला झाले आणि हे गृहस्थ गायब झाले आहेत. देशमुखांची चौकशी सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा मारला. त्याच घरात पाचवेळा जाऊन छापा मारण्याचा विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे. पाच पाचवेळा एखाद्या व्यक्तीच्या घरी जाणं कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असंही पवाारांनी सांगितलं.