गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा पैसा कुठे जातो? 'सामना'मधून भाजपाला पुन्हा खोचक सवाल

गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा पैसा कुठे जातो? ‘सामना’मधून भाजपाला पुन्हा खोचक सवाल

| Updated on: Sep 23, 2022 | 9:25 AM

गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा पैसा कुठे जातो? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपावर टीका करण्यात आली आहे.

गुजरातमधील (Gujarat) ड्रग्ज (Drugs) तस्करीचा पैसा कुठे जातो? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे (Shiv sena) मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपावर टीका करण्यात आली आहे. ‘मुंबई- महाराष्ट्रातील 10 टक्के कमिशनखोरीवर स्वत:चा बुलबुल वाजविणाऱ्यांनी गुजरातच्या ड्रग्जच्या तस्करीचा पैसा कोठे जातोय यावर बॅण्डबाजा वाजवायला हवा. या पैशाचे धनी कोण? हे भाजपाच्या पोपटांनी जाहीर करावे. ‘सी समरी’ करून प्रकरण दाबावे असा हा विषय नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा, तरुण पिढीला वाचविण्याचा हा विषय आहे. गुजरात तुमच्याइतकाच आमच्याही भावनेचा विषय आहे. आमच्या जुळ्या भावाला पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तानमधील ड्रग्ज माफियांच्या ताब्यात कसे जाऊ द्यावे’, असं सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी बुधवारी झालेल्या सभेतूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला होता. त्यानंतर आज सामनामधून भाजपाला खोचक टोला लगावण्यात आला आहे.

Published on: Sep 23, 2022 09:23 AM