पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, आमचं फाटलंय…
अजित पवार यांनी आज पुन्हा एकत्र नाही, असे म्हणत शरद पवार यांच्यासोबत जाणार नाही हे पुण्यातील सभेतून म्हटलंय. आता आमचं फाटलंय...शरद पवार यांच्यासोबत एकत्र येऊ अशा शंका कुशंका ठेवू नका असं स्पष्टच अजित पवार यांनी म्हटलंय
मुंबई, ५ मार्च २०२४ : शरद पवार यांच्यासोबत एकत्र येऊ अशा शंका कुशंका ठेवू नका, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे आज न् उद्या काका पुतणे एकत्र येतील? या प्रश्नाला अजित पवार यांनी पूर्णविराम दिलाय. अजित पवार यांनी आज पुन्हा एकत्र नाही, असे म्हणत शरद पवार यांच्यासोबत जाणार नाही हे पुण्यातील सभेतून म्हटलंय. आता आमचं फाटलंय…शरद पवार यांच्यासोबत एकत्र येऊ अशा शंका कुशंका ठेवू नका असं स्पष्टच अजित पवार यांनी म्हटलंय. तर तुमच्या सोबत एकत्र यायचं नाही हे शरद पवार यांनीच म्हटलंय, असं शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय. अजित पवार आता एकत्र नाहीच, असं स्पष्टपणे म्हणाले असले तरी दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टिव्ही ९च्या कॉन्क्लेव्हमध्ये परतीच्या दोरावरून भाष्य केले. आम्ही शरद पवार गटाकडे जाणार नसून मात्र परतीचे दोर त्यांच्यासाठी असून ते आमच्याकडे आले तर त्यांचं आम्ही स्वागत करू, असे तटकरे म्हणाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…