शिवसेना, धनुष्यबाण कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर शिंदे-ठाकरे सामना
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे असा सामना रंगणार आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा, अर्ज आणि पुरावे सादरीकरणाचा आजचा शेवटचा दिवस आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे असा सामना रंगणार आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा, अर्ज आणि पुरावे सादरीकरणाचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिंदे गट आणि शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा करणारे शिंदे गटाची मागणी स्थगित करण्यासाठी शिवसेना आज अर्ज करणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटही कोर्टामध्ये नवा अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तसंच दोन्ही गटांना खरी शिवसेना कुणाची याबाबत दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी म्हणणं आणि पुरावे सादर करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे पक्ष आणि चिन्हाबाबत तूर्तास निर्णय न घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश आहेत.
Latest Videos