‘मात्र त्यांना पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही’; अजित पवार गटाच्या नेत्याची शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून शरद पवार यांच्यावर अजित पवार गटाकडून टीका केली जात आहे. ज्यांना दैवत म्हटलं जात आहे त्याच पवार यांच्यावर अजित पवार गटाचे नेते आता टीका करत आहेत. याचदरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे.
पुणे : 21 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार गटाकडून अजित पवार गटाला टार्गेट केलं जात आहे. तर अजित पवार गटाकडूनही थेट शरद पवार यांच्यावरच निशाना साधला जातोय. याचदरम्यान पवार यांचे एके काळी अतंत्य विश्वासू असणारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच आता टीका केली आहे. त्यांनी, कार्यक्रमात पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही, असं आपण म्हणतो. पण महाराष्ट्रामध्ये त्यांना एकट्याच्या ताकतीवर एकदाही बहुमत घेता आलेलं नाही किंवा एकदाही मुख्यमंत्री करता आलेलं नाही, अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी, मायावती या अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे जातात मात्र आपल्या नेत्याला पुढे जाता येत नाही. आमचे फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. त्यानंतर कोणाशी तरी आघाडी करायची. त्यामुळेच आम्ही भाजपसोबत गेलो असेही ते म्हणालेत. त्यावरून आता त्यांच्यावर टीका होत आहे.