Nashik : काळ आला होता, पण वेळ..! पाणी भरताना तोल जाऊन विहिरीत पडली, पण थोडक्यात वाचली

Nashik : काळ आला होता, पण वेळ..! पाणी भरताना तोल जाऊन विहिरीत पडली, पण थोडक्यात वाचली

| Updated on: Jun 07, 2022 | 11:31 AM

एक महिला पाणी काढताना पडण्याची घटना घडल्यानं नाशिकमधील पाणी प्रश्न किती गंभीर बनलाय, हे अधोरेखित जालंय.

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) पाणी (Water) भरण्यासाठी गेलेली महिला (Women) तोड जाऊन थेट विहिरीत पडली. या सुदैवानं या महिलेला वाचवण्यात यश आलंय. पाणी भरण्यासाठी ही महिला विहिरीजवळ गेली होती. त्यावेळी या महिलेचा अचानक तोल गेला आणि ती विहिरीत कोसळली. यानंतर लगेचच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विहिरीत उतरुन महिलेचे प्राण वाचवले आहेत. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बोरीची बारी या गावात ही घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण सध्या भीषण पाणी टंचाई जाणवते आहे. त्यामुळे महिलांना वणवण पायपीट करावी लागतेय. काही दिवसांपूर्वीच तळ गाठलेल्या विहिरीताल चिखलातून पाणी गाळून काही जणांची पाण्यासाठी धडपड समोर आली होती. त्यानंतर आता एक महिला पाणी काढताना पडण्याची घटना घडल्यानं नाशिकमधील पाणी प्रश्न किती गंभीर बनलाय, हे अधोरेखित जालंय.

 

 

Published on: Jun 07, 2022 11:31 AM