Special Report: शिवसेना कुणी फोडली, अजित पवारांनी भाजप नेत्याचे नाव घेऊन सांगीतले
मविआ सरकारमधल्या पाणीपुऱवठा योजनेबद्दल बोलताना गुलाबराव पाटलांनी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी मदत केल्याचं विधान केलं. त्यावर हसन मुश्रीफांनी नेमके कोणते गुलाबराव खरे, हा प्रश्न केला. अधिवेशन सुरु झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या घोषणा गाजल्या होत्या., त्याच घोषणांवरुन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना टोले मारले
मुंबई : शिवसेना कुणी फोडली यावरुन अजित पवारांनी( Ajit Pawar) एका भाजप नेत्याच्या उदाहरणाचा दाखला दिला. मविआ सरकारमधल्या पाणीपुऱवठा योजनेबद्दल बोलताना गुलाबराव पाटलांनी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी मदत केल्याचं विधान केलं. त्यावर हसन मुश्रीफांनी नेमके कोणते गुलाबराव खरे, हा प्रश्न केला. अधिवेशन सुरु झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या घोषणा गाजल्या होत्या., त्याच घोषणांवरुन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना टोले मारले. मविआ सरकारवेळी एकनाथ शिंदेंनीच थेट जनतेतून नगराध्यक्ष
निवडण्याचा निर्णय घेतला होता., मात्र आता त्याच शिंदेंनी तो निर्णय बदलत लोकांमधून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतलाय. त्यावरुन विरोधकांच्या टीकेला शिंदेंनी उत्तर दिले. शिंदे जरी शिवसेनेचं नाव घेत असले, तरी सरकारमध्ये भाजपचाच वरचष्मा असल्याचा आरोप शिवसेना नेते भास्कर जाधवांनी केला. एकूणच आजच्या दिवशी अधिवेशनात फक्त सवाल-जवाब, टोले-प्रतिटोले पहायला मिळाले.