अयोध्येला कोणी दिला होता शाप ? आता शापमुक्तीकडे वाटचाल ?
अयोध्यानगरी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजली आहे. या मंदिराच्या उभारणीने अयोध्येत अनेक व्यावसायिक गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत. कधी काळी येथे कोणीही पैसे टाकण्यास तयार नव्हते. तेथे आता पंचतारांकित हॉटेससाठी 100 अर्ज आले असल्याने अयोध्यानगरी शापमुक्त झाल्याचे विमलेंद्र मिश्र यांनी म्हटले आहे.
अयोध्या | 29 डिसेंबर 2023 : अयोध्यानगरी रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी सज्ज झाली आहे. येत्या 22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील ऐतिहासिक भव्य दिव्य राममंदिरात रामलल्ला विधीवत पुर्जा अर्चा आणि मंत्रघोषात गर्भगृहात विराजमान होणार आहेत. परंतू अयोध्या एका शापातून मुक्त होत आहे असे म्हटले जात आहे. या ऐतिहासिक नगरीला या शाप सीतामातेने हजोरो वर्षांपूर्वी दिला होता आणि आता ती शापातून मुक्त होत आहे असे येथील राजघराण्याचे वंशज विमलेंद्र मिश्र यांनी म्हटले आहे. विमलेंद्र मिश्र यांचे वंशज अयोध्येची राज्यव्यवस्था चालवित होते. मधल्या काळात त्यांनी बसपातर्फे निवडणूक लढविली होती. राम मंदिराच्या निर्मितीमुळे येथे 100 फाईव्ह स्टार हॉटेलसाठी अर्ज आले आहेत. आता सीतेचा शाप दूर झाला असल्याचे विमलेंद्रे मिश्र यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले आहे. एका धारणेनुसार अयोध्येचे राजे प्रभू श्रीराम जेव्हा वनवासानंतर सीतेसह येथे परतले तेव्हा सीतामातेवर आक्षेप घेतले होते. त्यावेळी सीतामातेने अयोध्येत कधीच भरभराट येणार नसल्याचा शाप दिल्याचे म्हटले जाते.