Special Report | Hindustani Bhau नेमका कोण?-TV9

Special Report | Hindustani Bhau नेमका कोण?-TV9

| Updated on: Jan 31, 2022 | 9:09 PM

कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ, त्याचं नेमकं नाव काय, तो करतो काय, कुठल्या पक्षाशी तो संबंधीत आहे असे अनेक प्रश्न फक्त सरकारच नाही तर मीडियालाही शोधावं लागलं.

मुंबई : मुंबईत आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घातला. गर्दी एवढी जास्त होती की, पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मुंबईसारख्या ठिकाणी एवढी गर्दी तीही विद्यार्थ्यांची, त्यामुळे ठाकरे सरकारला घामटा फुटला नसता तरच नवल. पण मग हे सर्व विद्यार्थी आले कुठून, त्यांचं नेतृत्व नेमकं कुणी केलं? कुणाच्या आवहानावर ते जमा झाले असे अनेक प्रश्न पोलीसांना पडले, सरकारलाही पडले. आणि मग त्यातून हिंदुस्थानी भाऊचं नाव समोर आलं. कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ, त्याचं नेमकं नाव काय, तो करतो काय, कुठल्या पक्षाशी तो संबंधीत आहे असे अनेक प्रश्न फक्त सरकारच नाही तर मीडियालाही शोधावं लागलं. आणि त्याचाच शोध आम्हीही घेतला. विद्यार्थ्यांचं आदोलन पेटण्यापूर्वी काही वेळ आधीच तिथे हिंदुस्तानी भाऊ आलेला. मात्र त्याला तिथे न थांबू देता पोलिसांनी तिथून बाहेर काढलं. त्यानंतरच हे आंदोलन आणखी आक्रमक झालं. या हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी या ठिकाणाहून काढल्यानंतर हिंदुस्तानी भाऊने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, तो व्हिडिओ आता चांगलाच वायरल होत आहे.