Special Report | गर्दी दोघांच्या सभांना…पण मतं कुणाला जाणार?-

| Updated on: Aug 22, 2022 | 2:15 AM

आजही महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या सभेएवढी गर्दी कोणत्याही नेत्यासाठी जमत नाही. पण त्या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होत नाही, हे वास्तव आहे. म्हणून ठाकरे आणि शिंदे या दोघांच्या सभांना जमणारी गर्दी नेमका कौल कुणाला देते, हे महत्वाचं आहे.

मुंबई : शिवसेना फुटीनंतर आदित्य ठाकरेंच्या सभामंध्ये जमणाऱ्या गर्दीवरुन आरोप-प्रत्यारोप होतायत. आदित्य ठाकरेंनी जवळपास 13 ते 14 जिल्ह्यात दौरे केले. प्रत्येक दौऱ्यात गर्दी झाली आणि काही ठिकाणी जिथं गर्दी जमली. तिथलेच नेते-पदाधिकारी दुसऱ्या दिवशी शिंदे गटातही सामील झाले. गर्दीवरुन राजकारणाची सुरुवात आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेपासून सुरु झाली. ज्या सभेत अर्जुन खोतकरांनी शिवसेनेच्या मंचावरुन शिंदे गटावर टीका केली होती. त्याच अर्जुन खोतकरांनी 4 दिवसानंतर शिंदे गटाच्या मंचावरुन शिवसेनेवर बाण सोडले. जशी गर्दी आदित्य ठाकरेंच्या सभांना जमलीय, तशीच गर्दी नंतर एकनाथ शिंदेंच्या सभांनाही झालीय. मात्र याआधी गर्दीनं अनेकांचे अंदाज चुकवले आहेत.  आजही महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या सभेएवढी गर्दी कोणत्याही नेत्यासाठी जमत नाही. पण त्या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होत नाही, हे वास्तव आहे. म्हणून ठाकरे आणि शिंदे या दोघांच्या सभांना जमणारी गर्दी नेमका कौल कुणाला देते, हे महत्वाचं आहे.

Published on: Aug 22, 2022 02:15 AM