Maharashtra CM : महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? पहिली अडीच वर्ष...

Maharashtra CM : महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? पहिली अडीच वर्ष…

| Updated on: Nov 24, 2024 | 12:32 PM

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार?

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार? याची उत्सुकताही आता महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिल्यानंतर लागलेली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी संघ नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे तर १३२ आमदार भाजपचे निवडून आल्यानंतर आता भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याचे समोर येत आहे. तर पहिल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचे सूत्रांकडून कळतंय. अशातच भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे संघाकडून भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा याकरता दबाव आणि आग्रह आहे. तर संघाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी पहिली पसंती आहे. त्यासोबतच १३२ आमदार भाजपचे निवडून आल्यानंतर त्यांचीही भावना आहे की, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा.. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ही मागणी होतेय की हे जर महायुतीचं यश आहे तर अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात यावं. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Published on: Nov 24, 2024 12:32 PM