Kunal Kamra Video : शिंदेंना गद्दार म्हणणारा अन् शिवसेनेची खिल्ली उडणवारा कुणाल कामरा आहे तरी कोण?
स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा याच्यावरुन सध्यात राज्यात वाद सुरु आहे. एका कार्यक्रमात कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह गाण गायलं. यावरून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्हिडीओमुळे राज्यभरात वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं बनवलं. इतकंच नाहीतर कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत शिवसेनेची खिल्ली देखील उडवली त्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ‘थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो में चष्मा.. हाये एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाए जिस थाली में खाए…’, असं त्याने आपल्या गाण्यात म्हटलंय. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा आणि शिवसेनेची खिल्ली उडणवारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण? मुळचे मुंबईचे असलेले कुणाल कामरा एक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडिअन आहे. जाहिरात क्षेत्रापासून त्याच्या करिअरची सुरूवात झाली. २०१३ मध्ये त्याने स्टँडअप कॉमेडीमध्ये पदार्पण केलं. सरकार, राजकारणी आणि प्रसिद्धी व्यक्तींवर त्याने कॉमेडीतून टीका केली. कुणाल कामराचे युट्यूब चॅनलवर लाखो फॉलोअर्स आहेत.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
