PCAवरुन हकालपट्टी झालेला Rajkumar Dhakane कोण? राष्ट्रवादी काँग्रेसशी त्याचा काय संबंध?

PCAवरुन हकालपट्टी झालेला Rajkumar Dhakane कोण? राष्ट्रवादी काँग्रेसशी त्याचा काय संबंध?

| Updated on: Jul 10, 2021 | 10:50 AM

राजकुमार ढाकणे याचा सिक्युरिटी पुरवण्याचा व्यवसाय आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्डने कामाचे पूर्ण पैसे मागितल्यावर त्याच्या डोक्यात लायसन्स रिव्हॉल्वरचा दस्ता मारुन त्याला गंभीर जखमी केलं होतं.

महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य राजकुमार ढाकणे याची हकालपट्टी करण्यात आली आहे. तपासात ढाकणेविरोधात हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ढाकणेच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. यासंदर्भातील चौकशी अहवालानंतर ठाकरे सरकारने ढाकणेला हटवण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

राजकुमार ढाकणे याचा सिक्युरिटी पुरवण्याचा व्यवसाय आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्डने कामाचे पूर्ण पैसे मागितल्यावर त्याच्या डोक्यात लायसन्स रिव्हॉल्वरचा दस्ता मारुन त्याला गंभीर जखमी केलं होतं. याप्रकरणी 2015 मध्ये दाखल गुन्ह्याची न्यायालयात सुनावणी सुरु आहे. जागेवर अतिक्रमण करून कट करून फसवणूक केल्याचा गुन्हा, पुणे महापालिकेचे अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याचे दोन गुन्हे, फिनिक्स मॉलमध्ये बेकायदा घुसून दंगल माजवल्याचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाणे दाखल आहे.

Who is Rajkumar Dhakane who is removed from maharashtra state police complaints authority