'खरा मुख्यमंत्री कोण हे येत्या २-३ दिवसांत कळेल', आदित्य ठाकरे यांनी काय केला मोठा गौप्यस्फोट?

‘खरा मुख्यमंत्री कोण हे येत्या २-३ दिवसांत कळेल’, आदित्य ठाकरे यांनी काय केला मोठा गौप्यस्फोट?

| Updated on: Aug 14, 2023 | 5:19 PM

VIDEO | राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सहभागी झाल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री बदलण्यात येणार, अशा चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे आमदार आदित ठाकरे यांनी नेमकं काय केलं भाकित?

मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | राज्यातील सत्तेत अजित पवार सहभागी झाल्यानंतर राज्यातील सत्ताकारण वेगळ्याच वळणावर आल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री बदलण्यात येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘येत्या दोन-तीन दिवसांत कळेल की खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल,’. असे भाकितच आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तर ‘आता काय झाले आहे की खरा मुख्यमंत्री कोण हे संभ्रम आहे. पण येत्या दोन तीन दिवसात कळेल की खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल’, असे वक्तव्य आदित्य ठाकरे बीबीडी प्रकल्पाला भेट दिली त्यावेळी त्यांनी केले.

Published on: Aug 14, 2023 05:19 PM