मंगलप्रभात लोढा यांचे आवडते मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? हसले अन् म्हणाले…
VIDEO | महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची 'टीव्ही 9 मराठी'च्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' या विशेष कार्यक्रमात मुलाखत
मुंबई : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प‘ या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी मंगलप्रभात लोढा यांना रॅपिड प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये त्यांना एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस यापैकी आवडते मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर लोढा हसले. या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणं टाळलं. त्यांनी दुसरा प्रश्न विचारा असं सांगितलं. थेट विकास की पुनर्विकास असा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट विकास असं उत्तर दिलं. केंद्रातलं आवडीचं नेतृत्व कोणतं, अमित शाह की नरेंद्र मोदी? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी तीनवेळा नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. तर कोणते मुख्यमंत्री भावले? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण ते मुख्यमंत्री असताना त्यांना कधी भेटलो नाही