Devendra 3.0 : येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?

Devendra 3.0 : येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?

| Updated on: Dec 01, 2024 | 3:35 PM

मुंबईतील आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. कोणती खाती कोणाकडे असावी? मंत्रिमंडळ कसं असावं? कोणाकडे कोणती खाती असणार याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

येत्या ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. हा शपथविधी सोहळा येत्या ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहे. यासह अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीएतील घटक पक्षांचे नेते आणि संत, महंत आणि धर्मगुरू देखील उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह १० ते १५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. तर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरूण आमदारांचाही समावेश आहे. यावेळी फडणवीस सरकारमध्ये भाजपकडून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तर खाते वाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये मंगळवारी चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Published on: Dec 01, 2024 03:35 PM