शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? अजय चौधरी आणि सुधीर साळवींच्या समर्थकांमध्ये पोस्टर वॉर

मातोश्रीवर विद्यमान आमदारांना बैठकीसाठी बोलावलं होतं. यामध्ये मुंबईतील दोन विद्यमान आमदारांचा समावेश नव्हता. शिवडीचे अजय चौधरी आणि चेंबूर विधानसभेचे प्रकाश फातर्पेकर यांचा समावेश नव्हता. त्यामुळे यांना डच्चू दिला जाणार अस म्हटलं जातंय. त्यानंतर शिवडी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांमध्ये आपापसात पोस्टर वॉर रंगताना पाहायला मिळतंय.

शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? अजय चौधरी आणि सुधीर साळवींच्या समर्थकांमध्ये पोस्टर वॉर
| Updated on: Oct 20, 2024 | 1:51 PM

शिवडी विधानसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे. अशातच शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्या समर्थकांमध्ये चांगलंच पोस्टर वॉर रंगताना पाहायला मिळत आहे. जो मातोश्रीचा आदेश असेल तोच शिवडीचा उमेदवार असणार अशा आशयाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताय. अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्या समर्थकांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या नेत्यांचे पोस्टर व्हायरल केले जात आहे. शिवडी विधानसभेत निष्ठेची मशाल धगधगणार, असा अजय चौधरी यांच्या समर्थकांच्या पोस्टरवर उल्लेख आहे. तर संघर्षात साथ जनतेची मला भिती नाही विरोधकांची…असा उल्लेख असलेले पोस्टर सुधीर साळवी यांच्या समर्थकांकडून व्हायरल करण्यात येत आहे. अजय चौधरी हे ठाकरे गट शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. तर सुधीर साळवी हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

Follow us
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका.
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा.
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?.
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला.
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन.
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.