शिंदेंच्या सेनेकडून कोणाची वर्णी, ‘या’ 2 नेत्यांना मिळणार डच्चू? अर्थ, गृह, महसूल बडी खाती कोणाकडे?
एकाच जिल्ह्यांमधून अनेक नावं इच्छूक असल्याने मंत्रिमंडळ वाटपावेळी प्रमुख नेत्यांना रूसवे-फुगवे सांभाळावे लागणार आहे. दरम्यान यापूर्वी सरकारमध्ये शिंदेंकडून मंत्री राहिलेल्या दोन नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
लवकरच नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची घोषणा होणार आहे. अनेक आमदारांनी आपल्या गावी न जाता लाल दिव्यासाठी मुंबईत तळ ठोकला आहे. एकाच जिल्ह्यांमधून अनेक नावं इच्छूक असल्याने मंत्रिमंडळ वाटपावेळी प्रमुख नेत्यांना रूसवे-फुगवे सांभाळावे लागणार आहे. दरम्यान यापूर्वी सरकारमध्ये शिंदेंकडून मंत्री राहिलेल्या दोन नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड या दोन मंत्र्यांना यंदा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची शक्यता आहे. मोठ्या लॉबिंग नंतर शिंदेंच्या शिवसेनेने या संभाव्य मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार केले आहे. ज्यात दोन मंत्री नापास आणि इतर नावं पास झाल्याचे बोलले जात आहे. या आधी राहिलेल्या मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे आणि दीपक केसरकर तर संभाव्य नेत्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर आणि विजय शिवतारे या नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. येत्या ११ किंवा १२ तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. यापूर्वी तिनही नेत्यांना आपापल्या मंत्र्यांची यादी सादर करायची आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट