Maratha Reservation : आज तोडगा निघणार? शिंदे सरकारकडून जरांगे पाटील यांच्याशी चर्चेला कोण जाणार?
tv9 Marathi Special Report | 'जोपर्यंत मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेंतून मार्ग काढावा' असे जरांगे पाटील म्हणाले तर सरकारवर विश्वास ठेवावा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे आज तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. सत्ताधाऱ्यांपुढे पेच निर्माण होत आहे. तर यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झडू लागल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असून त्यांचा आवाज देखील मंद झाला आहे. सरकार सोबत मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचे आवाहन केलेय. त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृतीची काळजी घ्या असे म्हणत पाणी पिण्याची विनंती केली. भावनिक आवाहन करत असताना जरांगेंच्या कुटुंबाला देखील मंडपात घेऊन आले आहे. तर यापुढे कुटुंबाला माझ्यासमोर आणू नका आणि त्यांच्यासह मला भावनिक करू नका, असे आवाहन समर्थकांना केलंय. दरम्यान, जोपर्यंत मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या आणि चर्चेंतून मार्ग काढावा असे जरांगे म्हणाले तर सरकारवर विश्वास ठेवून तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी केलंय. त्यामुळे आता सरकारकडून कोण चर्चेला जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलंय.