‘या’ नेत्यानं व्यक्त केली मुख्यमंत्री होण्याची इच्छा; म्हणाले, ‘सत्ता सगळ्यांनाच हवी असते…’
VIDEO | 'सत्तेतून जनतेची काम होत असेल तर सत्तेचा प्रमुख होणे कधीही आवडेल', कुणी व्यक्त केली मुख्यमंत्री होण्याची इच्छा
धाराशिव : मी प्रामाणिकपणे काम करतो, जितके मला जमते तितके करतो, माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असे नाही. सुदैवाने छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहु महाराजांचा वारसा लाभल्याने इतर राजकीय नेत्यांसारखा मी नाही. मुळात मी राजकीय नेता नाही आणि मला ते व्हायचं नाही, असे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले आहे. सत्ता केंद्र कोणाला आवडत नाही, सत्ताही सगळ्यांनाच हवी असते मी खासदार होतोच मी कुठे त्यावेळी खासदारकी नको म्हणालो. सत्तेतून जनतेची काम होत असेल तर सत्तेचा प्रमुख होणे कधीही आवडेल, असे वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केले असून हे वक्तव्य करत त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संभाजीराजे गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात स्वराज्य संघटनेच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी दौऱ्यावरती आहेत, यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.