शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा, शिवसेनेसह शिंदे गट, मनसेचाही मेळावा?

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा, शिवसेनेसह शिंदे गट, मनसेचाही मेळावा?

| Updated on: Aug 30, 2022 | 11:23 PM

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेचं पुढं नेत आहेत. त्यामुळं राज ठाकरेंनीही दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याकडं करणार आहेत.

मुंबई : दसरा पाच ऑक्टोबरला आहे. पण, शिवाजी पार्कवर कोणाला दसरा घेता येणार असा प्रश्न निर्माण झाला. शिवसेनेनं परवानगीसाठी अर्ज केलाय. पण, मुख्यमंत्री शिंदे यांनी मेळावा घ्यावा, अशी मागणी शिंदे गटाच्या आमदारांनी केली. तसाच आग्रस राज ठाकरे यांच्यासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांचाही आहे. शिवसेनेनं महापालिकेकडं दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. पण, अजूनतरी शिवसेनेच्या अर्जावर निर्णय झालेला नाही. शिंदे गटाकडून दसरा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडं आग्रह आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेचं पुढं नेत आहेत. त्यामुळं राज ठाकरेंनीही दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याकडं करणार आहेत.

 

Published on: Aug 30, 2022 11:23 PM