योजना कुणाची वाद कुणाचा? चित्रा वाघ यांचा वाद नेमका कुणाशी?
भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांच्यातला वाद टीपेला पोहोचलाय. दोन्ही बाजूनं एकमेकांवर तिखट शब्दांत उत्तर दिलं जातंय. या वादाची सुरुवात झाली होती लेक लाडकी योजनेवरुन.
मुंबई : 5 ऑक्टोबर 2023 | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानावरुन चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात वाकयुद्धाचा भडका उडालाय. हा वाद का सुरु झाला आणि तो कुठपर्यंत पोहोचला? शिंदे-फडणवीस सरकारनं लेक लाडकी योजना सुरु केली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर टीका केली. महिला सुरक्षेचा विषय देखील आहे. आर आर पाटील होते तेव्हा सुखरूप वाटायचं ना? हे लेक लाडकी बोलत आहेत पण महिलांचा द्वेष करणारा हा पक्ष आहे. मी खूप जवळून पाहत आहे. सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन यांचं तिकीट कापण्याच काम केलं. त्यावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुळेंना उत्तर दिलं. या वादाची सुरुवात तिथूनच झाली. दोन्ही बाजूने अजूनही वादाचे अंक बाकी असल्याचा इशारा दिला गेलाय. त्यामुळे हे वाक्ययुद्ध मिटण्याऐवजी अजून वाढण्याची चिन्हं आहेत.