Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Election 2024 : महायुतीमध्ये कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?

Assembly Election 2024 : महायुतीमध्ये कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?

| Updated on: Nov 04, 2024 | 1:31 PM

महाराष्ट्रात येत्या २० नोव्होंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार असून २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली तर आज ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केलेल्या उमेदवारांना आज दुपारी ३ वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर यानंतर प्रत्येक मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. तर मविआ आणि महायुती बंडखोरी रोखण्यात यशस्वी होणार का? हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महायुतीतून काही नेत्यांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. बोरिवलीतून गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. हिंगोलीतील भाजपचे बंडखोर नेते रामदास पाटील सुमटानकर, विक्रमगडचे शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश निकम हे नॉट रिचेबल आहेत. बोईसरचे शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार जगदीश धोडी ४ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. पालघरचे भाजपचे बंडखोर उमेदवार अमित घोडा हे २ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. आणखी कोण बंडखोरी करण्याच्या तयारीत? कोण लढणार अपक्ष?

Published on: Nov 04, 2024 01:31 PM