महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला MIM चा विरोध का? Sanjay Raut यांचा सवाल

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला MIM चा विरोध का? Sanjay Raut यांचा सवाल

| Updated on: Jan 23, 2022 | 4:39 PM

शहरात एकिकडे मोठा थाटामाटात शिवाजी पुतळ्याची (Aurangabad Shivaji Statue) स्वारी औरंगाबादेत धडकली आहे तर दुसरीकडे आणखी एका पुतळ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून हा वाद पेटलाय.

शहरात एकिकडे मोठा थाटामाटात शिवाजी पुतळ्याची (Aurangabad Shivaji Statue) स्वारी औरंगाबादेत धडकली आहे तर दुसरीकडे आणखी एका पुतळ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून हा वाद पेटलाय. एक कोटी रुपये निधीतून हा पुतळा उभारणीचे काम करण्याचा प्रस्ताव आहे. हे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी शिवसेना, भाजपने आग्रह धरला आहे, मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पुतळ्याला विरोध केला आहे. दरम्यान, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांचा निषेध राजपुत समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्या इम्तियाज जलील यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करू नये, असा इशारा राजपूत समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला MIM चा विरोध का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Jan 23, 2022 03:40 PM