देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी, नेमकं कारण काय? पाहा हा स्पेशल रिपोर्ट… VIDEO
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये सोमवारी डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. या दोघांमध्ये तब्बल सव्वा तासांची चर्चा झाली, मात्र आपण अराजकीय गप्पा मारायला गेलो होतो, असे फडणवीस म्हणाले.
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये सोमवारी डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. या दोघांमध्ये तब्बल सव्वा तासांची चर्चा झाली, मात्र आपण अराजकीय गप्पा मारायला गेलो होतो, असे फडणवीस म्हणाले. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे चर्चांना देखील उधाण आलं आहे. विशेष म्हणजे कर्नाटक निकाल, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि नोटाबंदीमुळे राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. यावरून भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. अशा टीकांमुळे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी गेले असल्याची टीका मविआच्या नेत्यांनी केली आहे. तर “राज ठाकरे पाहुणचार चांगला करतात, देवेंद्र फडणवीस यांनी 8 दिवस शिवतीर्थावर राहायला जावं”, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत लगावला. तसेच फडणवीस आणि राज ठाकरे यांचे बॅनर लावत राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. त्यामुळे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय ? यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिर्पोर्ट…