गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण का नको?, अजित पवारांनी सांगितली निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये येणारी नेमकी अडचण!
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यामुळे काय समस्या निर्माण होऊ शकतात हे देखील सांगितले आहे.
मुंबई : राज्यात शिंदे, फडणवीस सरकार येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा केली होती. या घोषणेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावले होते. आता पुन्हा एकदा गोविंदाच्या आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे गैरव्यवहार होण्याची शक्यात आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दहिहंडीत सहभागी खोळाडू नक्की कोण आहे, त्याचं शिक्षण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतील. तेव्हा एकनाथ शिंदे हे नुकतेच मुख्यमंत्री झाले होते, मात्र या निर्णयाच्या खोलात जावून विचार केल्यास असं लक्षात येईल की हा निर्णय प्रत्यक्षात कृतीत आणण्यामध्ये अनेक अडचणी आहेत, असं पवार यांनी म्हटलं आहे.

'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया

कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला

'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं

'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
