उस्मानाबादचं नाव धाराशिव आणि औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगरच का? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

उस्मानाबादचं नाव धाराशिव आणि औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगरच का? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Feb 25, 2023 | 11:37 PM

तुम्हाला औरंगबाद शहराचा आणि उस्मानाबाद शहराचा इतिहास काय? बघा यासंदर्भातील टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट....

मुंबई : अखेर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं नामांतरण अधिकृतपणे झालं आहे. मात्र आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव तर बदललं पण आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर, हे औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आलंय. मग शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर तर जिल्ह्याचं नाव औरंगाबाद कसं? असा सवाल अंबादास दानवेंनीही उपस्थित केला. शहराचं नाव बदलण्यासाठी केंद्रानं पत्रक काढलं. आता महसूल विभाग जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी पत्रक काढणार. त्यामुळं शहर, तालुका आणि जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगरच असेल. तुम्हाला औरंगबाद शहराचा आणि उस्मानाबाद शहराचा इतिहास काय? बघा यासंदर्भातील टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट….

Published on: Feb 25, 2023 11:35 PM