Devendra Fadnavis | सोशल डिस्टन्सिंग ठेवून मंदिरे उघडण्यास हरकत काय? फडणवीस यांचा सरकारला सवाल

Devendra Fadnavis | सोशल डिस्टन्सिंग ठेवून मंदिरे उघडण्यास हरकत काय? फडणवीस यांचा सरकारला सवाल

| Updated on: Aug 17, 2021 | 5:04 PM

एकीकडे सर्व आस्थापना हळूहळू नियम ठरवून देत सुरु होत आहेत. अशावेळी मंदिराबाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. लसीकरणाचा वेग वाढवत सरकार टाळेबंदीतील शिथिलता ही वाढवत आहे. एकीकडे सर्व आस्थापना हळूहळू सुरु करण्याचा प्रयत्न राज्यसरकार करत आहे. सरकार नियम आखून देत विविध ठिकाणं सुरु करत आहे. नागरिकांना देखील संपूर्ण लसीकरण केल्यानंतर अशा ठिकाणी जाण्याची परवानगी सरकार देत असून मंदिराबाबत मात्र अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.

याच मुद्द्यावरुन बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून मंदिरे उघडण्यास हरकत काय? असा सवाल फडणवीस यांनी सरकारला विचारला. तसेच बार, मॉल सुरु करण्यास परवानगी दिल्याने अशा ठिकाणी मंदिरापेक्षा कमी गर्दी होते का? असा सवालही फडणवीस यांनी सरकारला विचारत धारेवर धरले.