Antilia Bomb Scare| ...म्हणून अंबानींच्या घरासमोर स्फोटकांची गाडी, वाझे प्रकरणात एनआयएचा खळबळजनक दावा

Antilia Bomb Scare| …म्हणून अंबानींच्या घरासमोर स्फोटकांची गाडी, वाझे प्रकरणात एनआयएचा खळबळजनक दावा

| Updated on: Sep 04, 2021 | 9:26 AM

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Vaze) उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने कोर्टात तब्बल दहा हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवलं त्याची कारणं मिळाली आहेत. सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Vaze) उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने कोर्टात तब्बल दहा हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवलं त्याची कारणं मिळाली आहेत. सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती. स्फोटकांच्या कारचा तपास करुन, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळेल, अशी आशा सचिन वाझेला होती, मात्र इथेच तो फसला आणि जेलमध्ये गेला.

अंबानी स्फोटकंप्रकरणात (Mukesh Ambani bomb scare) आणि मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren) यामध्ये सचिन वाझे मुख्य आरोपी आहे. सध्या सचिन वाझे जेलमध्ये आहे. सचिन वाझे हा ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात निलंबित झाला होता. मात्र ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर 2020 मध्ये तो परत पोलीस दलात दाखल झाला. वाझेला थेट क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट अर्थात CIU चे प्रमुख पद मिळालं.