म्हणून रखडलाय शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले कारण, म्हणाले...
सातारा : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, यासंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ विस्तार का रखडला आहे .याचे कारण स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, आत्तापर्यंत ज्या पोटनिवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढलीये त्या ठिकाणी भाजपचा धुव्वा उडवलेला आहे. आत्ता अशी परिस्थिती अशी आहे की आपलं सरकार टिकेल का नाही याची शाश्वती नसल्यामुळे शिंदे सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. यामुळे कोर्टाकडे लक्ष असून रोज दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत. महाराष्ट्राचे मोठे नुकसान होतंय यामुळे प्रशासनाविषयी न बोललेलं बरं. अशापरिस्थिती आता झालेल्या निवडणुकीतला विजय आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भविष्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तर आमचा विजय हा निश्चित असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल आहे.