खासदार नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं...

खासदार नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं…

| Updated on: Mar 03, 2024 | 1:16 PM

भाजपच्या मेळाव्यात अमरावतीच्या खारदार नवनीत राणा या भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर स्वतः नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले आहे. माझी आणि रवी राणांची चर्चा नेहमी सुरू असते आम्ही....

अमरावती, 3 मार्च 2024 : नागपूरमध्ये भाजपचा मेळावा आहे. दरम्यान, या मेळाव्यात अमरावतीच्या खारदार नवनीत राणा या भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर स्वतः नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले आहे. ‘माझी आणि रवी राणांची चर्चा नेहमी सुरू असते आम्ही बोललो तरी चर्चा आणि नाही बोललो तरी चर्चा असते. त्यामुळे नेहमीच आम्ही चर्चेत असतो.’, असे त्यांनी म्हटले तर आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खासदार नवनीत राणा यांनी थेट प्रतिक्रिया देत सूचक संकेतही दिले आहे. आम्ही एनडीए सोबत आहेत त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं नाही. उद्या नमो युवा संमेलन आहे एनडीएचे घटक म्हणून मी उद्या त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. तर कोण काय बोलताय यावर मी बोलत नाही.. कोण राजकारणात येणार? कोण राजकारण सोडणार? हा विषय माझा नाही, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

Published on: Mar 03, 2024 01:16 PM