विधानसभेला शिंदेच महायुतीचा चेहरा असणार? ‘त्या’ बॅनरवरून चर्चा तर विरोधकांचा भाजपला सवाल
मदतीचा हात एकनाथ.. असे फलक मुंबईसह राज्यात लागल्याने महायुती आगामी निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार का? याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीच्या निवडणुकीचा चेहरा कोण असणार? याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नुकतच धर्मवीर २ चं पोस्टर लाँच करण्यात आलं त्यावेळी हा विषय कलाकारांनी छेडला होता
आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा असणार का? याची चर्चा मुंबईत लागलेल्या एका पोस्टरमुळे होताना दिसतेय. मदतीचा हात एकनाथ.. असे फलक मुंबईसह राज्यात लागल्याने महायुती आगामी निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार का? याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीच्या निवडणुकीचा चेहरा कोण असणार? याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नुकतच धर्मवीर २ चं पोस्टर लाँच करण्यात आलं त्यावेळी हा विषय कलाकारांनी छेडला होता. त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटताना दिसताय. तर सत्तेत गेल्याच्या पहिल्याच दिवशी भविष्यात आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. दर दुसरीकडे शिंदे समर्थक नेते आगामी निवडणूक ही शिंदेंच्या नेतृत्वात लढली जाईल, असे संकेत देताय…. बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Jul 02, 2024 10:57 AM
Latest Videos