Special Report | दिल्ली पोलिसांकडून संजय राऊतांवर कारवाई होणार?
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पोलिसांनाच ललकारले आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. मी दिल्लीतच बसलोय. अधिवेशन संपल्यानंतरही दिल्लीतच राहिल. येताय तर या. मी तुमची वाट पाहतोय, अशा शब्दात संजय राऊत यांनी पोलिसांना आव्हान दिलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पोलिसांनाच ललकारले आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. मी दिल्लीतच बसलोय. अधिवेशन संपल्यानंतरही दिल्लीतच राहिल. येताय तर या. मी तुमची वाट पाहतोय, अशा शब्दात संजय राऊत यांनी पोलिसांना आव्हान दिलं. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं. मी काही चुकीचं बोललो नाही. माझ्याकडून कोणताही गुन्हा झालेला नाही. मी सुशक्षित नागरीक आहे. मला शब्द आणि शब्दांचे अर्थ चांगले समजतात. तक्रारदारापेक्षाही मला त्याचे अर्थ अधिक कळतात. तक्रार समजून न घेता गुन्हा दाखल करणं हे बेकायदेशीर आहे. पोलिसांच्या क्षमतेवर शंका माझी शंका आहे. मी दिल्लीत बसलोय. वाट बघतोय. दिल्लीतही शिवसेना आहे. तुम्हाला बेकायदा कळतो, कायदा कळतो. मी पार्लमेंट संपल्यावरही थांबणार आहे. येताय तर या, असं राऊत म्हणाले.