राज्यातील विजेचे दर वाढणार? ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिले संकेत

राज्यातील विजेचे दर वाढणार? ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिले संकेत

| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 4:03 PM

राज्यात दिवसेंदिवस वीजेची (Electricity) मागणी ही वाढत आहेत. अशातच कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवर काही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे भारनियमनाची (load shedding) टांगती तलवार राज्याच्या डोक्यावर आहेत.

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस वीजेची (Electricity) मागणी ही वाढत आहेत. अशातच कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवर काही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे भारनियमनाची (load shedding) टांगती तलवार राज्याच्या डोक्यावर आहेत. मात्र हे भार नियम टाळण्यासाठी आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला (Mahavitran) वीज खरेदी करण्यास मान्यता दिली गेली आहे. हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Published on: Apr 08, 2022 04:03 PM