Special Report | गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर पुन्हा ST विलीनीकरणासाठी लढणार का?

Special Report | गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर पुन्हा ST विलीनीकरणासाठी लढणार का?

| Updated on: Aug 17, 2022 | 9:25 PM

एसटी विलीनीकरणावरुन ज्यांनी याआधीच्या सरकारला धारेवर धरलं होतं, त्या गोपीचंद पडळकरांनी आम्ही एसटीसंदर्भात पाठपुरावा सुरुच ठेवणार असल्याचं मह्टलंय. संपावेळी काही भाजप नेत्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती., तर काहींनी विलीनकरण शक्य नसेल तर त्यावर दुसरा चांगला पर्याय देण्याचंही सुचवलं होतं. मात्र वकिल सदावर्ते आणि इतर काही नेतेमंडळी विलीनीकरणावर ठाम होती.

मुंबई :  ज्या गुणरत्न सदावर्ते( Gunaratna Sadavarte), सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) आणि गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar ) एसटी विलीनीकरणाराठी(ST merger) ऐतिहासिक संपाचं नेतृत्व केलं. अनेक रात्र आझाद मैदानावर मुक्कामी थांबून एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढा दिला., तीच त्रिमूर्ती आता पुन्हा एसटी विलीनीकरणासाठी पाठपुरावा करणार का? हा प्रश्न विचारला जातोय.

दरम्यान, एसटी विलीनीकरणावरुन ज्यांनी याआधीच्या सरकारला धारेवर धरलं होतं, त्या गोपीचंद पडळकरांनी आम्ही एसटीसंदर्भात पाठपुरावा सुरुच ठेवणार असल्याचं मह्टलंय. संपावेळी काही भाजप नेत्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती., तर काहींनी विलीनकरण शक्य नसेल तर त्यावर दुसरा चांगला पर्याय देण्याचंही सुचवलं होतं. मात्र वकिल सदावर्ते आणि इतर काही नेतेमंडळी विलीनीकरणावर ठाम होती.

ज यासंदर्भात सदावर्तेंची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना संपर्क केला., पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र सरकार कुणाचंही असो, सदावर्तेंच्याच दाव्यानुसार कैदी नंबर 5618  हा नंबर कायम एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढत राहीन, असा विश्वास संपात सहभागी झालेल्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांना आहे.