हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार? अजितदादा महायुतीत अन् भाजपचे 19 नेते अडचणीत?
इंदापूरचे हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर हर्षवर्धन पाटील यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. जवळपास भाजपच्या १९ नेत्यांमागे तिकीटाचं टेन्शन नेमंक का आहे? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
अजित पवार यांच्या महायुतीच्या प्रवेशाचं राजकीय गणित आता गुंतागुंतीचे होत चाललं आहे. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात बॉल टाकून शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या बोलण्यात नाराजी वजा जर तरचा सूरही पाहायला मिळालं. त्यामुळे भविष्यात हर्षवर्धन पाटील कमळ सोडून तुतारी हाती घेणार का? याचीच सध्या चर्चा होताना दिसतेय. सध्या महायुतीत सध्या ज्या जागेवर जे आमदार आहेत. त्यांना त्याच जागा दिल्या जाव्यात असा महायुतीतील नेत्यांचा सूर आहे. त्यामुळे भाजपच्या एक दोन नव्हे तर तब्बल १९ नेत्यांचं भविष्य टांगणीला लागलंय. दरम्यान, काल परवाच समरजीत घाटगेंनी भाजपसोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. कागलमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांचं तिकीट फिक्स आहे. गेली १० वर्ष भाजपच्या आशेवर थांबलेले घाटगे गेल्या वेळी अपक्ष म्हणून लढले. यंदाही तयारी सुरू होती मात्र अजित पवार भाजप सोबत आल्याने अडचण झाल्याचे म्हटलं गेलं. हीच गोष्ट हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत झाली.. कसं बघा स्पेशल रिपोर्ट