Manoj Jarange Patil : थोडं थांबा…सरकारला थोड्या दिवसात कळेल, जरांगे पाटलांचा सूचक इशारा काय?
VIDEO | तुमचं पोरगं गेलं तर बिनधास्त कुंकू पुसायचं रडायचं नाही..., जरांगे पाटील म्हणाले, लढाई खेळायला जायचं म्हटल्यावर क्षत्रियाने रडायचं नसतं आपण क्षत्रिय आहोत. क्षत्रियाचा धर्म आहे तो. लढताना मरण आलं तर मागे सरायचं नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही
जालना, २९ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची तब्येत खराब झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच त्यांना समाजाकडून पाणी पिण्याचे आवाहन केले जात आहे. यावेळी त्यांनी नकार देत म्हटले, मी समाजाला मानतो नंतर मी माझ्या कुटुंबाचा. माझ्या कुटुंबानेमध्ये येऊ नये. मी पहिला समाजाचा आहे. जगलो तर तुमचा. मेलो तर समाजाचाय पुढे ते असेही म्हणाले, लढाई खेळायला जायचं म्हटल्यावर क्षत्रियाने रडायचं नसतं आणि भ्यायचं नसतं. आपण क्षत्रिय आहोत. तुमचं पोरगं गेलं तर बिनधास्त कुंकू पुसायचं रडायचं नाही. क्षत्रियाचा धर्म आहे तो. लढताना मरण आलं तर मागे सरायचं नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही. फक्त तुम्ही शांततेत आंदोलन करा. आता फक्त दोनच पर्याय आहेत. सरकारने एक तर आरक्षण द्यावं, नाहीतर मराठ्यांशी शांततेत सामना करायचा. दुसरा पर्यायच राहिला नाही. आता हळूहळू देशातील क्षत्रिय मराठा उठणार आहे. हे थोड्या दिवसात कळेल. थोडं थांबा, असा इशारा त्यांनी दिलाय.