विधानसभेच्या दारूण पराभवानंतर ‘मविआ’चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
२८८ पैकी महाराष्ट्रात महायुतीत भाजपचे १३२ शिंदेंच्या शिवसेनेचे ५७ आमदार तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ असे एकूण २३० आमदार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे २०, काँग्रेसचे १० आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १० असे एकूण ४६ आमदार निवडून आलेत
विधानसभा निवडणुकीच्या निकालातील दारूण पराभवानंतर महाविकास आघाडी एकत्रित राहणार की दुभंगणार? अशी चर्चा रंगू लागली आहे. महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केल्यानंतर आता महाविकास आघाडीचं भविष्य काय? असा सवाल केला जात आहे. कारण २८८ पैकी महाराष्ट्रात महायुतीत भाजपचे १३२ शिंदेंच्या शिवसेनेचे ५७ आमदार तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ असे एकूण २३० आमदार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे २०, काँग्रेसचे १० आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १० असे एकूण ४६ आमदार निवडून आलेत. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात विरोधी पक्षा देखील निवडता येणार नाही. त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे काही १० उमेदवार जिंकले आहेत. त्यापैकी काही आमदार आमच्याकडे येतील असा दावा अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी केलाय. २८८ जागांपैकी सत्ताधाऱ्यांकडे २३० आमदारांचं बहुमत आहे तर विरोधात फक्त ४९ संख्याबळ आहे. यातील शरद पवारांच्या १० पैकी अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सांगितले. सक्षम विरोधी पक्ष नसताना महाविकास आघाडीची एकजूट राहिल का? आणि राहिली तर ते महायुतीला टक्कर देण्याइतके सक्षम असतील का? असाही सवाल केला जात आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
