हिवाळी अधिवेशनात बीडमधील जाळपोळ अन् घरावरील हल्ल्यावर चर्चा होणार? संदीप क्षीरसागर काय म्हणाले?
बीडची जाळपोळ घटना दुर्दैवी होती. कट रचून हा प्रकार घडविण्यात आला. या घटनेत माझं घर आणि राष्ट्रवादी भवन जाळण्यात आले. सात आठ तास जाळपोळ सुरू होती. प्रशासन गप्प का होते? संदीप क्षीरसागर यांनी थेट सरकारला सवाल केला. तर यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात घरावरच्या हल्ल्यावर प्रश्न उचलणार असल्याचेहा म्हटले
बीड, १४ नोव्हेंबर २०२३ | बीडमधील ३० ऑक्टोबर रोजी झालेली जाळपोळ परिस्थिती पाहण्यासाठी रोहित पवार बीडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पाडवा बीडमध्ये करण्याचे सांगितले होते. त्यामूळे आज ते बीडमध्ये होते. जाळपोळीच्या घटनेवर बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, बीडची जाळपोळ घटना दुर्दैवी होती. कट रचून हा प्रकार घडविण्यात आला. या घटनेत माझं घर आणि राष्ट्रवादी भवन जाळण्यात आले. सात आठ तास जाळपोळ सुरू होती. प्रशासन गप्प का होते? हा माझा प्रश्न आहे. सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. मुख्यालयासमोर माझं घर होत, पोलीस घटनास्थळी होते, तरीही पोलीस गप्प होते, यांचं कारण मला कळलं नाही. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. याचा मास्टर माईंड अद्याप फरार आहे. मास्टर माईंड हा राजकीय आहे. मास्टर माईंड कोण आहे हे पोलिसांना माहिती आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करून त्याला अटक करावी, अशीही मागणी त्यांनी केली.