रक्षाबंधनला सुप्रिया सुळेंना भेटणार का? अजितदादांनी स्पष्टच म्हटलं, …तर तिला भेटणार
येत्या १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना एक सवाल केला. रक्षाबंधनला सुप्रिया सुळेंना भेटणार का असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. तर या प्रश्नाला अजित दादांनी काय उत्तर दिलं.. बघा व्हिडीओ
लोकसभा निवडणुरीत बारामतीतून लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. यामुळे पवार कुटुंबात फूट पडल्याची चर्चा होती. मात्र गेल्या वर्षी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे रक्षाबंधनचे फोटो समोर आले नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती मात्र यंदाच्या वर्षीतरी रक्षाबंधनला अजित पवार सुप्रिया सुळे हे एकमेकांना भेटणार की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात अजित पवार यांना सवाल केला असता, ते म्हणाले, ‘माझा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्या दौऱ्यात मी ज्या शहरात असले तिथल्या बहिणींन भेटण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तिथं जर सुप्रिया असेल तर तिलाही भेटणार आहे’, असे अजित पवार म्हणाले. तर सुप्रिया सुळे म्हणाल्या, रक्षाबंधन या दिवशी मी नाशिक दौऱ्यावर आहे, आधी लग्न कोंढाण्याचं… माझा कार्यक्रम ठरला आहे. ते कुठे आहेत मला माहिती नाही, राखी बांधणार की नाही हे तुम्हाला कळेलच, असे सुप्रिया सुळे म्हणाल्यात.