आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी घेतला नवसाचा मोदक
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी विघ्नहर्ता गणपतीचे दर्शन घेतले. नवसाला पावणारा गणपती अशी या मंदिराची ख्याती आहेत. यावेळी आमदार बांगर यांनी देवाला साकडे घातले.
हिंगोली : 28 सप्टेंबर 2023 | नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली येथील विघ्नहर्ता गणपतीची ख्याती आहे. विघ्नहर्ता गणपतीचे आमदार संतोष बांगर यांनी दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार संतोष बांगर यांनी 2019 ला मोदक घेतला होता आणि माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. आता 2024 साठी मोदक घेतलाय असे सांगितले. विघ्नहर्ता गणपतीसमोर ज्याने संकल्प सोडला त्यांचा नवस पूर्ण होतो. 2019 ला माझ्या घरच्यांनी मी आमदार व्हावे म्हणून मोदक घेतला होता. ती इच्छा पूर्ण झाली. माझा नवस पूर्ण झाला. आता 2024 साठी मोदक घेतला आहे. या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राहावं यासाठी प्रार्थना केली आहे, असे आमदार बांगर यांनी सांगितले. न्यायदेवतेवर विश्वास आहे. 16 आमदार अपात्रतेच्या सुनावणीत आमचे सर्व आमदार पात्र ठरतील असा मला विश्वास आहे. आमच्या बाजुनेच निकाल लागणार, असे ते म्हणाले.