मान-सन्मान... मविआ-युतीचा एकमेकांवर घमासान, वंचित आघाडी मविआसोबत की मग स्वतंत्र?

मान-सन्मान… मविआ-युतीचा एकमेकांवर घमासान, वंचित आघाडी मविआसोबत की मग स्वतंत्र?

| Updated on: Mar 25, 2024 | 1:38 PM

महायुतीत कुणाला किती जागा मिळतील यावरून खल सुरू आहे. तर महाविकास आघाडी वंचित सोबत असणार की नाही? यावरूनही चांगलाच वाद रंगतोय. काल प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत युती तोडत महाविकास आघाडी सोबत युती होणार की नाही ते....

मित्रपक्षांची महायुती आणि महाविकास आघाडी यात घमासान रंगलंय. यादरम्यान, महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी जाणार का? यावर मंथन सुरू आहे. याचाही फैसला दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. महायुतीत कुणाला किती जागा मिळतील यावरून खल सुरू आहे. तर महाविकास आघाडी वंचित सोबत असणार की नाही? यावरूनही चांगलाच वाद रंगतोय. काल प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत युती तोडत महाविकास आघाडी सोबत युती होणार की नाही ते पुढे बघू असं म्हटलं. यावर संजय राऊतांनी एकतर्फी युती तोडणं दुर्दैवी असून आंबेडकरांना फेर विचाराचं आवाहन केलं. वंचितने मविआकडे २७ जागांचा प्रस्ताव दिला होता. यावर चर्चेतून पुढचा मार्ग काढू असे म्हटलं तर मविआकडून वंचितला केवळ ४ जागांचा प्रस्ताव असल्याचे संजय राऊतांनी म्हटले. त्यावर वंचितची किती जागांची मागणी आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. वंचित आघाडी मविआसोबत की मग स्वतंत्र? असणार बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 25, 2024 01:36 PM